प्रतिनिधी गोंदिया
गोरेगाव पोलीस ठाणे अंतर्गत सोनी मार्गावर अनियंत्रित पिकप वाहन विद्युत खांबाला धडकले या घटनेत विद्युत खांबाचे दोन तुकडे होऊन विद्युत विभागाला मोठे नुकसान झाले . घटना 23 एप्रिल च्या सायंकाळच्या सुमारास घडली .
सविस्तर वृत्त असे की निवडणुकीच्या काळात जिल्ह्यांतील प्रमुख मार्गावर चेक पोस्ट तयार करण्यात आले होते. वाहन थांबविण्यासाठी चेक पोस्टवर पोलीस विभागाकडून बॅरिकेट्स लावण्यात आले होते . निवडणूक प्रक्रिया संपताच प्रत्येक चेक पोस्ट वरून बॅरिकेट्स वाहनाने आणल्या जात आहेत .गोरेगाव पोलिसांकडून सुद्धा सोनी नोनिटोला येथील चेक पोस्ट वरून पिकप वाहन क्रमांक एमएच 35 एजे २०५६ वर बॅरिकेट्स मांडून गोरेगाव कडे आणत असताना वाहन चालकाचे पिकप वाहनावरून नियंत्रण सुटले व वाहन अनियंत्रित होऊन सोनी मार्गावरील लहान नाल्यासमोरील विद्युत खांबाला धडकले धडक एवढी जोरदार होती की विद्युत खांबाचे दोन तुकडे झाले. मात्र या घटनेत कोणत्याच प्रकारचे जीवित हानी झाली नाही मात्र विद्युत विभागाचे मोठे नुकसान झाले . काही वेळ सोनी गाव परिसरातील विद्युत खंडित करण्यात आली होती.
Social Plugin