मोबाईल दिला नाही म्हणून फायटरने मारहाण, ३३ वर्षीय व्यक्ती जखमी

नाशिक - फुलेनगर भागात मोबाईल दिला नाही या कारणातून एकास फायटरने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत ३३ वर्षीय व्यक्ती जखमी झाला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बॉबी बाबर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत विरेद्र हवालदार राम (रा.गौडवाडी,फुलेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. विरेंद्र राम गुरूवारी (दि.१८) सायंकाळी परिसरातील प्रविण किराणा दुकानामागे बसलेला असतांना संशयिताने त्यास गाठले.
यावेळी एक फोन लावायचा आहे असे म्हणून त्याने मोबाईलची मागणी केली. मात्र राम याने मोबाईल देण्यास नकार दिल्याने संतप्त संशयिताने फायटरने त्यास बेदम मारहाण केली. या घटनेत विरेंद्र राम जखमी झाला असून अधिक तपास हवालदार सानप करीत आहेत