रामनगर पोलीस ठाणे अंतर्गत गायत्री मंदिर , जी डी सी बँक च्या समोर अज्ञात आरोपीतानी गोळी घालून रेती व्यवसायी गोलू तिवारी याचा खून केल्याची घटना 22 एप्रिल च्या रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली .घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली अवघ्या काही तासातच या प्रकरणी मुख्य आरोपी सहित सात आरोपींना अटक करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शास्त्री वॉर्ड गोंदिया निवासी मोहित मराठे वय 36, राजेंद्र उर्फ बंटी दावणे वय 42 ,हिरो शंकर दावणे वय 37 दोन्ही दसखोली निवासी, शिवानंद उर्फ सुजल भेलावे, विनायक रवींद्र नेवारे वय 31 दोन्हीं राहणार राहणार गिरोला , गोंदिया निवासी रितेश उर्फ सोनू खोब्रागडे व मध्यप्रदेश राज्यातील जबलपूर निवासी सतीश सुग्रीव सेन वय 23 राहणार जबलपूर यांचा समावेश असून सदर आरोपींच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात कलम 302 च्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस उपअधीक्षक रोहिणी बनकर यांनी माहिती दिली की सदर घटना जुना वाद व पैशाच्या देवाण-घेवाण वरून करण्यात आलेली आहे. हनुमान नगर गजानन कालोनी निवासी गोलू उर्फ रोहित तिवारी हा रेतीचा व्यवसाय करीत होता. 22 एप्रिल च्या रात्री गोलू तिवारी हा आपल्या मोटरसायकलने पाल चौक कडून गायत्री मंदिराकडे कुडवा मार्गाने जात होता. दरम्यान मोटरसायकलवर सवार असलेल्या दोन युवकांनी गोलू तिवारीवर बंदुकीने गोळ्या झाडल्या. गोळ्या लागल्याने गोलू तिवारी हा मोटरसायकल वरून खाली पडला . घटना निदर्शनात येतात परिसरातील नागरिकांनी गोलू तिवारीला जवळच्या एका खाजगी इस्पितळात उपचारासाठी भरती केले .मात्र उपचारा दरम्यान गोलू चा मृत्यू झाला. या घटनेची तक्रार मिळताच रामनगर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात कलम 302 च्या अंतर्गत गुन्हा नोंद करून आरोपींची शोध मोहीम सुरू करण्यात आली . या दरम्यान अवघ्या काही तासातच पोलिसांना घटनेच्या सदर सातही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक करण्यात यश आले. सदर सातही आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले . पुढील तपासणीसाठी न्यायालयाने आरोपींना 29 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी पुढील माहिती दिली की मृतक गोलू तिवारी हा वर्ष 2012 मध्ये झालेल्या धर्म दावणे हत्याकांडातील आरोपी होता व तो सध्या बेलवर बाहेर आला होता. या घटनेचां तपास जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बनकर यांच्या मार्गदर्शनात रामनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केजडे करीत आहेत.
Social Plugin