छत्रपती संभाजीनगर, लातूर व धाराशिव जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा बसला. लातूरला दोन तास गारपीट झाली. त्यात दोन ठिकाणी वीज कोसळून २१ वर्षीय तरुणासह ६५ वर्षीय वृद्धा ठार झाली. एका चिमुकलीचाही मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यात ९ गुरे दगावली, तर धाराशिवला वीज पडून पाच गुरे आणि १० शेळ्या ठार झाल्या.
नांदेड, हिंगोली, जालना आणि बीड जिल्ह्यातही अवकाळी पाऊस कोसळला. संभाजीनगरमध्ये शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दाणादाण उडवली. शहराच्या विविध भागांत झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब वाकले. वीजवाहिन्या तुटल्या. शहरातील बहुतांश भागातील वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित होता. सायंकाळी अर्ध्या तासात १६.३ मिलिमीटर पाऊस पडला
Social Plugin