मतदान करू दिले नाही म्हणून वृद्धाची पाण्याच्या टाकीवर चढून विरूगिरी.... गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील बबई येथील घटना...*

    सारस न्यूज एक्सप्रेस गोरेगाव
 भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव आणि आमगाव हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ नक्षलग्रस्त असल्याने 3 वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली.. दरम्यान 3 वाजता बबई येथील एक वृद्ध मतदार मतदान केंद्रावर गेला.. त्याला मतदान न करू दिल्याने वृद्ध व्यक्ती पाण्याच्या टाकीवर चढला... याची माहिती गोरेगाव पोलिसांना मिळतात गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय भुसारी यांनी तात्काळ घटनास्थळ गाठत त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला व अर्ध्या तासानंतर त्याला खाली उतरण्यात पोलिसांना यश आले सुखराम रहांगडाले ( 62) असे वृद्धाचे नाव आहे..