प्रतिनिधी गोंदिया
गोंदिया गोरेगाव महामार्गावरील हिरडामाली मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पायदळ जाणाऱ्या एका व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना 23 एप्रिल च्या रात्री दहा वाजताच्या सुमारास समोर आली. मृत युवकाचे नाव हिरडामाली निवासी दिनेश काशीराम राऊत वय 35 असे आहे.
सविस्तर वृत्त असे की गोंदिया गोरेगाव हावेमार्गावर हिरडामाली हे गाव आहे .या मार्गावरून सदर मृतक दिनेश राऊत पायदळ जात होते . दरम्यान एका अज्ञात वाहनाने दिनेशला धडक दिली या धडकेत दिनेशचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीसानी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा संशोधनासाठी मृतकला कोणत्या मेडिकल कॉलेज येथे पाठविले. व अज्ञात आरोपी वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे . घटनेचा तपास पोलिस हवालदार शहारे करीत आहेत.
Social Plugin