दरवर्षी १७ मे हा दिवस 'जागतिक उच्च रक्तदाब दिन' म्हणून पाळला जातो. या आजाराविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिन पाळला जातो. या दिनाचे बोधवाक्य Know your numbers (आपल्या बी.पी.चा आकडा जाणून घ्या) असे आहे. " तुमचा रक्तदाब अचुकपणे मोजा, त्यावर नियंत्रण ठेवा, दिर्घकाळ जगा " ही यावर्षीची थीम आहे. रक्त गोठणे, किंवा गोठणे ही अशी प्रक्रिया आहे. ज्याद्वारे रक्तवाहिनीला दुखापत झाल्यास जास्त रक्तस्त्राव टाळण्यासाठी रक्त गुठळ्या तयार करतात.
गेल्या काही वर्षांत लोकांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. सध्या देशातील शहरी भागांत २० ते ४० टक्के आणि ग्रामीण भागातील १२ ते १७ टक्के जनतेला उच्च रक्तदाब आहे. धावपळीची जीवनशैली, कामाचे वाढलेले तास, धूम्रपानाच्या जोडीला मद्यपान आणि आरोग्याला अपायकारक ठरणाऱ्या खाण्याच्या सवयींमुळे अनेक तरुण तरुणी उच्च रक्तदाबाच्या समस्येला बळी पडत आहेत. पण, सर्वात मोठी समस्या म्हणजे आपल्याला उच्च रक्तदाब आहे याची कल्पनाच अनेकांना नसते. रक्तदाबाच्या आजाराला खुले आमंत्रण आहे. मात्र चोरपावलांनी वस्तीला येणे, हा त्याचा गुण असल्याने अनेकांना त्याची खबरच लागत नाही. तो फारसा गाजावाजा न करता हळूच चोरपावलांनी येतो, त्याचे अस्तित्व काही काळ बरेच जणांना जाणवतही नाही; पण नंतर मात्र तो आक्रमक होतो आणि त्याची दखल आपल्याला घ्यावीच लागते. हळूच प्रवेशलेला हा पाहुणा अगदी आयुष्यभरासाठी आपले कायमचेच बस्तान बसवतो. नेमका कोण आहे हा? ‘हा’ आहे, मुख्यत: चुकीच्या जीवनशैलीमुळे आपला जीवनसाथी होणारा ‘उच्च रक्तदाब’ वा हायपरटेन्शन किंवा शॉर्टकट संबोधन म्हणजे बी.पी.आज भारतात प्रौढांपैकी साधारणत:२३ टक्के लोकांना बीपीचा आजार आहे. याखेरीज अर्थात अनेकांना आपल्याला हा आजार आहे, याचीच कल्पना नसते, हे लक्षात घेतले, तर रुग्णांची टक्केवारी २३ टक्क्यांहून जास्त असण्याचीच शक्यता आहे.
पूर्वीच्या काळी उतारवयात लोकांना बी.पी.चा त्रास मागे लागायचा. अलीकडे मात्र तरुण वयातच तो गाठतो. ‘आमच्या ओपीडीचा चेहरा तरुण होत चाललाय’ असे गमतीने हृदयरोगतज्ज्ञ म्हणतात. ज्येष्ठ नागरिका बरोबरच तरुण मॅनेजर्स, सीईओचा भरणा आज रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये आहे. पूर्वी साठीला लागणारी औषधे त्यामुळेच आज तिशीतच गरजेची बनतात. इतकेच काय, पण शालेय मुलांमध्येही रक्तदाब वाढलेला दिसतो, असे काही पाहण्यांमध्ये दिसून आले. पुन्हा श्रीमंत गरीब, शहरी ग्रामीण अशा सर्वच वर्गात हा आजार आता आढळतो. जगभरच अर्थात हा ट्रेंड आहे. आणि ज्या झपाट्याने या रुग्णांची संख्या वाढते आहे. हृदयाच्या आकुंचन (Systole) व प्रसरणाने (Diastole) रक्तवाहिन्यांमध्ये रक्त वाहते. रक्ताचा वाहिन्यांच्या भिंतींवर जो दाब पडतो, तो म्हणजे रक्तदाब. शरीरातील अनेक रसायने व यंत्रणा हा रक्तदाब नियंत्रित करत असतात. साधारणत: १२०/८० (सिस्टोलिक/ डायस्टोलिक) हे बी.पी. नॉर्मल समजले जाते. १४०/९० ही नॉर्मल रक्तदाबाची सीमारेषा. १४०/९० च्या वर असला तर उच्च रक्तदाब समजला जातो. अर्थात, असे रिडिंग सातत्याने मिळाले तरच त्याला बी.पी.चा रुग्ण मानले जाते. कधी कधी शारीरिक, मानसिक धावपळीने तात्पुरता रक्तदाब वाढतो व नंतर लगेच नॉर्मललाही येतो. म्हणून डॉक्टर वेगवेगळ्या दिवशी रक्तदाबाची तपासणी करतात. सातत्याने तो वाढलेला दिसला तरच त्याला उच्च रक्तदाबाचा रुग्ण, असे शिक्कामोर्तब केले जाते. रक्तदाबाचा त्रास मागे लागण्यामागे काय कारणे मुख्यत: आहेत? नेमक्या एका कारणावर बोट ठेवता येत नाही. अनेक वेगवेगळे घटक यास कारणीभूत असतात. वाढते वय, अनुवंशिकता या कारणांखेरीज यास जीवनशैली मुख्यत: कारणीभूत असते. लठ्ठपणा, चुकीचा आहार, यातही सोडियमयुक्त आहार अधिक म्हणजे आहारात मिठाचे प्रमाण अधिक व पोटॅशियमयुक्त आहार कमी म्हणजे फळे व भाज्या कमी, धूम्रपान, दारूचे व्यसन, सुस्त रुटीन, व्यायामाचा अभाव, मानसिक ताणतणाव हे घटक रक्तदाब वाढवण्यास कारण ठरू शकतात.
रक्तदाब वाढू लागला की लक्षणे दिसतीलच असे नाही. म्हणूनच याला चोरपावलाने येणारा आजार ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते. हे अत्यंत धोक्याचे आहे. कारण लक्षण दिसली नाहीत तर सहसा कोणी डॉक्टरकडे धाव घेत नाही, अशीच आपली कृती असते. त्यामुळे वाढलेला रक्तदाब आपल्या अनेक अवयवांवर नकळत दुष्परिणाम करत जातो. काही जणांमध्ये लक्षण दिसतात. उदा. सूज, थकवा, डोकेदुखी, अस्पष्ट दिसणे, धाप लागणे, उलट्या, चक्कर, बधिरता. पण इतरही अनेक आजारांत ही लक्षणे दिसतात. त्यामुळे हा रक्तदाबाचाच त्रास आहे, असे काही लगेच सुशिक्षित माहीतगारांच्याही लक्षात येत नाही.या वरील चर्चेवरून नियमित वैद्यकीय तपासणी तरुणपणापासूनच (२५-३० वयापासूनच) केल्यास रक्तदाबावर नजर ठेवली जाईल. समजा रक्तदाब नियंत्रणात नाही राहिला, बराच काळ वाढलेल्या स्थितीत राहिला तर काय गुंतागुंत होते? मेंदूत वा इतर अवयवात रक्तस्राव, हार्ट अटॅक, मूत्रपिंडे निकामी होणे अशा अनेक इमर्जन्सी येतात. पण जर वेळीच रोगनिदान झाले व औषधोपचार नियमित चालू ठेवले, जीवनशैली सुधारली, तर नक्कीच हा आजार आपल्या कह्यात राहतो. उच्च रक्तदाबासाठी विविध प्रकारची, विविध प्रकारे शरीरात काम करणारी औषधे उपलब्ध आहेत. रुग्णाचे वय, रक्तदाबाची तीव्रता, इतर आजार (उदा. मधुमेहही आहे का), किडनी-यकृताची कार्यक्षमता अशा अनेक बाबींचा विचार करून उपचार मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोणत्या रुग्णाला कोणते औषध द्यायचे, हे डॉक्टर ठरवतात. या गोळ्या रोज नियमितपणे ठरलेल्या वेळी घेणे आवश्यक असते.पण अगदी सुशिक्षिता मध्येही उपचारांत धर-सोड करणारे ४०-५०% रुग्ण आढळतात.
कंटाळा,विसरणे,‘सवय’लागते हा गैरसमज,दुष्परिणामाची विनाकारण भीती,तपासणीत नॉर्मल दिसले तर ‘आता काय बी.पी. नॉर्मल आहे, कशाला घ्यायची गोळी’ असा घातक विचार, मध्येच इतर पॅथीकडे वळणे अशामुळे गोळी सोडली जाते. यथावकाश रक्तदाब नियंत्रणात न राहिल्याने वर उल्लेख केल्याप्रमाणे स्ट्रोक, हार्ट अटॅक अशा इमर्जन्सी येतात व थेट ‘आयसीयू’त धाव घ्यावी लागते. हे सर्व नियमित औषधे घेतल्याने टळू शकते, पण तरी अनेक रुग्णांची ‘बंडखोरी’ ही आपत्ती ओढवून घेत असते. रक्तदाबाची औषधे बहुतांशी रुग्णांना आयुष्यभर घ्यावीच लागतात. कोणतेही औषध म्हटले की साइड इफेक्ट्स असू शकतात. कोरडा खोकला, घोट्यावर सूज, थकवा, पोटॅशिअमचे रक्तातील प्रमाण कमी जास्त होणे वगैरे दुष्परिणाम काही रुग्णांमध्ये दिसू शकतात. झोपण्याच्या स्थितीतून झटकन उभे राहायला गेले, तर तोल जाऊ शकतो. हे विशेषत: वृद्ध रुग्णांमध्ये दिसते. गोळ्या चालू करताना अपेक्षित काही दुष्परिणाम आहेत का, याविषयी डॉक्टरांना जरूर विचारावे व नंतर काही त्रास वाटल्यास स्वमनाने गोळी बंद न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रुग्णांना रक्तदाबाखेरीज इतर काही आजार असतील, तर त्यांना अनेक औषधे घ्यावी लागतात. यापैकी काही औषधांचा रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो. उदा.काही वेदनाशामकांच्या सतत सेवनाने, सर्दी खोकल्याच्या काही औषधांनी, स्टिरॉईड्समुळे, गर्भनिरोधक गोळ्या यामुळे रक्तदाब वाढू शकतो व त्यामुळे रक्तदाबाच्या गोळ्यांचा परिणामही कमी होऊ शकतो. मधुमेह व अस्थमाच्या औषधांचेही रक्तदाबाच्या औषधांशी पटत नाही. म्हणून आपण घेत असलेल्या सर्व औषधांचे एकमेकांत पटावे, त्यांच्यात आंतरक्रिया (interactions) होऊन काही दुष्परिणाम होऊ नयेत, यासाठी आपल्या प्रत्येक डॉक्टरांना इतर डॉक्टरांनी दिलेली सर्व औषधे सांगणे वा दाखवणे गरजेचे आहे.त्यानुसार डॉक्टर्स औषधयोजना करतील. अॅसिडिटीसाठी अनेक रुग्ण स्वमनाने वारंवार अँटासिड्स वापरतात. अनेक अँटासिड्स मध्ये सोडियम असते. त्यामुळे ती कधीतरी घेणे ठीक; पण वारंवार योग्य नाही. अॅसिडीटी, सर्दी खोकला यासाठी मी स्वमनाने कोणती औषधे घेऊ शकतो, हे डॉक्टरांना विचारून ठेवावे.
धावपळीची जीवनशैली, कामाचे वाढलेले तास, धूम्रपानाच्या जोडीला मद्यपान आणि आरोग्याला अपायकारक ठरणाऱ्या खाण्याच्या सवयींमुळे अनेक तरुण,तरुणी उच्च रक्तदाबाच्या समस्येला बळी पडत आहेत. पण, सर्वात मोठी समस्या म्हणजे आपल्याला उच्च रक्तदाब आहे याची कल्पनाच अनेकांना नसते. रक्तदाबाच्या आजाराला खुले आमंत्रण आहे. मात्र चोरपावलांनी वस्तीला येणे, हा त्याचा गुण असल्याने अनेकांना त्याची खबरच लागत नाही. तो फारसा गाजावाजा न करता हळूच चोरपावलांनी येतो, त्याचे अस्तित्व काही काळ बरेच जणांना जाणवतही नाही; पण नंतर मात्र तो आक्रमक होतो आणि त्याची दखल आपल्याला घ्यावीच लागते. हळूच प्रवेशलेला हा पाहुणा अगदी आयुष्यभरासाठी आपले कायमचेच बस्तान बसवतो.
-डॉ.नितीन वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी
Social Plugin