सारस न्यूज एक्सप्रेस
: गोंदिया नगर परिषदेच्या वतीने दफन घेण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे मृत्यूनंतरही मृतदेहाला मरण यातना भोगाव्या लागत आहे . असे चित्र मागील अनेक वर्षापासून तिथे बघायला मिळत आहे छोटा गोंदिया येतील स्थानिक नागरिकांनी गोंदिया नगर परिषदेकडे मागणी केली आहे मृतदेहाला पुरण्यासाठी तात्काळ दफनभूमी उपलब्ध करून देण्यात यावी.
हिंदू धर्मात मृत्यूनंतर मानवी देहाचे अंतिम संस्कार करण्यासाठी मानवी देहाला दहन केल्या जाते तर काही समाजामध्ये त्यांच्या संस्कृतीनुसार मानवी देहाला दफनभूमीत विधिवत पुरवून अंतिम संस्कार केल्या जाते . यासाठी शासनाकडून दहन व दफनभूमीसाठी भूमी उपलब्ध करून देण्यात येते . मात्र गोंदिया नगर परिषदेच्या वतीने मागील अनेक वर्षापासून दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली नसल्यामुळे
नाही लाजाने हिंदू धर्मातील काही समाजातील मृतदेहांना दफनविधी करण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. शहरातील मामा चौक ,छोटा गोंदिया ,संजय नगर ,गोविंदपुर परिसरातील नागरिकांना मृतदेहाला पांगोली नदी परस्परातील जमिनीवर विधी करावी लागत आहे . त्यामुळे पांगोली नदीला प्रदूषित होण्याचा मोठा धोका निर्माण झालेला आहे. ही गंभीर समस्या मागील अनेक वर्षापासून बघायला मिळत आहे. या बाबीला गंभीरतेने घेऊन जनशक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्था गोंदिया च्या वतीने गोंदिया नगर परिषद, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व स्थानिक आमदार यांना पत्र देऊन मागणी करण्यात आली की दफन विधी साठी तात्काळ भूमी उपलब्ध करून देण्यात यावी . अशी माहिती संघटनेचे संयोजक तीर्थराज उके, मार्गदर्शक मयूर मेश्राम, अध्यक्ष अनिल शरणागत ,आशिष उईके देवेंद्र शेंडे, रोशन पाचे, अनिल ढोमणे आदींनी दिली आहे.
Social Plugin