: गोंदिया शहरालगत असलेल्या छोटा गोंदिया परिसरामध्ये मध्यरात्री हत्येचा थरार घडला. क्षुल्लक वादातून मित्रानेच आपल्या मित्रावर धारदार शस्त्राने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राहुल बिसेन (२१) असे मृतक तरुणाचे नाव आहे. तर सोनू भोयर (२२) असे आरोपी मित्राचे नाव आहे. मध्यरात्रीच्या सुमारास क्षुल्लक वादातून हत्येचा थरार घडला. हत्या केल्यानंतर आरोपी सोनु भोयर हा फरार झाला आहे. घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
Social Plugin