हॉस्पिटलला लागलेल्या आगीत सहा नवजात अर्भकांचा मृत्यू….नवी दिल्लीतील घटना

     सारस न्यूज़ एक्सप्रेस वृतसेवा 
दिल्लीत मुलांच्या हॉस्पिटलमध्ये शनिवारी रात्री उशिरा लागलेल्या भीषण आगीत सहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत सहा नवजात अर्भकांचा मृत्यू झाला तर १२ मुलांना वाचवण्यात यश आले आहे.
शनिवारी रात्री ११.३२ वाजता पूर्व दिल्लीतील विवेक विहारमधील एका बेबी केअर सेंटरमध्ये आग लागली. अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अधिकाऱ्यांनी सांगितले, की १२ नवजात बालकांना इमारतीतून बाहेर काढण्यात आले; मात्र उपचारादरम्यान सहा जणांचा मृत्यू झाला. एका बालकासह आणखी सहा अर्भकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीचे कारण कळू शकले नाही. रुग्णालयात आग कशामुळे लागली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही