प्रतिनिधी गोरेगांव
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या SSC (दहावी) परिक्षेत मुंडीपार येथिल दिप किशोर धमगाये या विद्यार्थीने ९२.२०% घेऊन लोकमान्य टिळक विद्यालय मुंडीपार शाळेतुन प्रथम स्थान पटकवून शाळेचे व गावाचे नाव रोशन केले आहे. परीक्षेत प्रथम स्थान प्राप्त केल्याबद्दल दिप धमगाये यांच्या घरी भेट घेऊन जि.प.सदस्य डॉ.लक्ष्मण भगत यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.तसेच पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी माजी सरपंच सुमेंद्र धमगाये, माजी उपसरपंच तथा वर्तमान ग्रा.पं.सदस्य जावेद (राजा भाई) खान,आदिवासी गोवारी समाजाचे अध्यक्ष मनिराम राऊत,चर्मकार समाजाचे अध्यक्ष छोटेलाल गमधरे, रोहित पांडे, अंकुश बोमले,शिवशंकर बिसेन,हेमराज पटले, राजकुमार पारधी,सरफराज शेख,बबलु चौधरी,राहुल राऊत ,योगराज भोयर,राजु भोयर,संतोष चौधरी,डिलेश राऊत व आदी उपस्थित होते.
Social Plugin