नाशिक (सारस न्यूज एक्सप्रेस वृत्तसेवा) – कंत्राटदाराने सिमेंट काँक्रेट रस्ता पूर्ण केल्यानंतर काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात ४० हजार रुपयाची लाच घेतांना सुरगाणा उप विभागाचे जिल्हा परिषदेचे उपअभियंता नंदलाल विक्रम सोनवणे हे लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांना कार्यकारी अभियंता, ( इवद ) 2, जिल्हा परिषद, नाशिक यांचे कडून सुरगाणा तालुक्यातील दोन गावांना सिमेंट काँक्रेट रस्ता बनवण्याचे काम देण्यात आले होते. त्यावर आलोसे उप अभियंता यांना देखरेख करण्याचे अधिकार दिलेले आहेत. सदरील काम तक्रारदार यांनी विहित वेळेत पूर्ण केले होते. परंतु त्यांना सदरील काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले नव्हते. तक्रारदार यांना सदरील प्रमाणपत्र देण्याचे मोबदल्यात दोन्ही कामाची अं. प. रक्कम २० लाख रुपयेच्या २ टक्के प्रमाणे नंदलाल विक्रम सोनवणे यांनी लाचेची मागणी करून ४० हजार रुपये लाचेची रक्कम पंच साक्षीदार यांच्या समक्ष स्वीकारली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे
Social Plugin