सारस न्यूज एक्सप्रेस
भंडारा:- भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक तथा प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले. त्यामध्ये सारस पक्षी संवर्धन मोहीम अंतर्गत कृषि निविष्ठा केंद्र धारकांना प्रबोधन कार्यशाळा शुक्रवार दिनांक १६ मे रोजी मोहाडी पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली.सदर कार्यशाळेचे आयोजन कृषी विभाग पंचायत समिती तथा मोहाडी तालुका कृषी कार्यालयद्वारे करण्यात आले.
यावेळी कार्यशाळेत वृषाली देशमुख, तालुका कृषी अधिकारी मोहाडी, रितेशभाऊ वासनिक, सभापती पंचायत समिती मोहाडी, विकास चौधरी, मोहीम व कृषी अधिकारी भंडारा, शाहीद खान, सदस्य जिल्हा सारस संवर्धन समिती तथा मानद वन्यजीव रक्षक भंडारा, संजय न्यायमूर्ती, कृषी अधिकारी मोहाडी, विजय गायधने, अध्यक्ष ऍग्रो डीलर असोसिएशन मोहाडी, पाटील, कृभको कंपनी व नॅनो टेक्नॉलॉजी अंतर्गत युरिया व डीएपी लिक्वीड fertilizer मार्गदर्शन बाबत मार्गदर्शक प्रामुख्याने उपस्थित होते. तर शाहीद खान ह्यांनी कार्यशाळेत सारस पक्षी व त्याचे अधिवास क्षेत्र संरक्षण व संवर्धनबद्दल माहिती दिली. तसेच प्रतिबंधित किटकनाशके विक्रीस कडक निर्बंध वर माहिती देवून कृषि व किटकनाशके विक्री केंद्रधारकांचे प्रबोधन केले. केंद्र शासनाचे नोटीफिकेशन नुसार प्रतिबंधीत व प्रस्तावित प्रतिबंधित किटकनाशके बाबत माहीती व विक्रीस कडक निर्बंध याबाबत सविस्तर माहीती दिली. प्रस्तावीत प्रतिबंधीत किटक नाशकांपैकी मोनोक्रोटोफॉस (Monocrotophos), एसेफेट (Acephate) या किटकनाशकांचा वापर सनियंत्रण ठेवणे व विक्रीवर कडक निर्बंध लावण्याबद्दल कार्यशाळांच्या माध्यमातून ताकीद करण्यात आली. प्रशिक्षण अंतर्गत खत, बियाणे व कीटकनाशके बाबत मार्गदर्शन करण्यात आले
संजय न्यायमूर्ती, कृषि अधिकारी, पंचायत समिती मोहाडी ह्यांनी सभा संचालन व प्रस्तावना केली. कार्यशाळेला भोयर ,भाजीपाले चव्हाण गोरे सर्व विस्तार अधिकारी मोहाडी व मोहाडी तालुक्यातील सर्व कृषि केंद्रधारक उपस्थित होते.
Social Plugin