दीड लाखाच्या लाच प्रकरणात पुरातत्व विभागाच्या महिला अधिकारीसह पर्यटन विभागाचा डायरेक्टर एसबीच्या जाळ्यात

         सारस न्यूज एक्सप्रेस 
कंपनी चालू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पुरातत्व विभाग नाशिक येथील सहाय्यक संचालक आरती मृणाल आळे या दीड लाखाची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्या. या लाच प्रकरणात आळे यांनी तेजस मदन गर्गे, डायरेक्टर पर्यटन व सांस्कृतिक संचलानालय विभाग, महाराष्ट्र राज्य,मुंबई यांना लाच स्वीकारले बाबत सांगून त्यांचे हिश्याचे पैसे कोणाकडे देऊ बाबत कळविले असता सदर लाचेची त्यांच्या हिश्याची रक्कम त्यांनी स्वीकारण्याची संमती दर्शवली म्हणून त्यांचेवर इंदिरानगर पोलीस स्टेशन, नाशिक शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईबाबत एसीबी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांना कंपनी चालू करण्यासाठी पुरातत्व विभाग ,नाशिक यांचे ना हरकत प्रमाणपत्र लागत असल्याने ते मिळणेकामी त्यांनी अर्ज केला होता. सदरचे प्रमाणपत्र देण्याकरिता तक्रारदार यांचेकडे पुरातत्व विभाग नाशिक येथील सहाय्यक संचालक आरती मृणाल आळे यांनी दिनांक ६ मे रोजी दीड लाखाची लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम दिनांक ७ मे रोजी. पंचासमक्ष सदर लाचेची रक्कम दीड लाख स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर आरती मृणाल आळे यांनी तेजस मदन गर्गे, डायरेक्टर पर्यटन व सांस्कृतिक संचलानालय विभाग, महाराष्ट्र राज्य,मुंबई यांना लाच स्वीकारले बाबत सांगून त्यांचे हिश्याचे पैसे कोणाकडे देऊ बाबत कळविले असता सदर लाचेची त्यांच्या हिश्याची रक्कम त्यांनी स्वीकारण्याची संमती दर्शवली म्हणून त्यांचेवर इंदिरानगर पोलीस स्टेशन, नाशिक शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे