सारस न्यूज एक्सप्रेस गोंदिया
काल व आज शनीवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसाचा तडाखा गोरेगाव तालुक्यांतील शहारवाणी, पिंडकेपार, गोरेगाव व गोंदिया शहर परिसराला बसला आहे. वादळी पावसामुळे अनेक घरांवरील टीन पत्र्याचे छत उडाले. तसेच झाडांची आणि विद्युत खांबांची पडझड झाली आहे .गोंदिया शहरातील शहर पोलीस ठाण्याच्या मागच्या परीसरात गर्ल्स कॉलेज मार्गावरील झाड अचानक तुटल्याने दोघेजण जखमी झाल्याची माहितीही देण्यात येत आहे .
जिल्ह्यातील शहारवाणी, पिंडकेपार, कुरांडी परीसरात सायंकाळी जोरदार वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नागरिकांनी आता शासनाकडे मदतीची मागणी केली आहे.
Social Plugin