आ.विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नाना यश ; विद्यमान सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहना योजना सह अन्नपूर्णा योजनेची केली घोषणा**आ.विनोद अग्रवालांनी राज्य शासनाने मानले आभार ; योजनेची अमलबजावणी जुलै २०२४ पासून होणार*

प्रतिनिधी/गोंदिया : नुकतेच गोंदिया विधानसभा क्षेत्रातील जनतेचे आमदार विनोद अग्रवाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मध्यप्रदेश च्या धर्तीवर शुरू असलेली लाडकी बहना योजना महाराष्ट्रात ही शुरू करण्यात यांवी अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला राज्य सरकारने मान्य केली असून या योजनेची अमलबजावणी जुलै २०२४ पासून शुरू होणार आहे या करीता आ.विनोद अग्रवाल यांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त केले आहे. 
सदर योजना विद्यमान सरकारचे होत असलेले अखेरचे अर्थसंकल्प यामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडरही मोफत मिळणार आहेत. या योजनेतून महिलांना संधी उपलब्ध करून देणे महिलांचे स्वावलंबन, पोषण अशा सर्वांगीन विकासासाठी या योजेअंतर्गत 21 ते 60 वर्षे वयाच्या पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येईल. यासाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येईल. या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येणार आहे. करीता आ.विनोद अग्रवाल यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहे. 
आमदार विनोद अग्रवाल हे त्यांच्या अनोख्या संकल्पनांसाठी ओळखले जातात, त्यांच्या अशाच अनेक संकल्पना महाराष्ट्रभर सुरू झाल्या आहेत. विशेषत: आमदार होण्यापूर्वी ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि शिक्षण विभागाचे सभापती असताना त्यांनी 'गावची शाळा' आमची शाळा मोहीम सुरू केली होती, जी आजही संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. याशिवाय ग्रामपंचायत स्तरावर बीपीएल प्रमाणपत्र मिळण्याची मागणीही मान्य करण्यात आली असून, कोणत्याही धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना धान विकण्याचे स्वातंत्र्य असावे, ही मागणीही शासनाने मान्य केली आहे.अश्या ब-याच त्यांच्या मागण्या राज्य शासनाने मान्य केली आहे.