सारस न्यूज एक्सप्रेस
| धाराशिव मतदारसंघातून एक मोठी माहिती समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचा धाराशिव बालेकिल्ला आहे. सध्या ठाकरे गटाचे नेते ओमराजे निंबाळकर हे मोठ्या फरकाने विजयाकडे वाटचाल करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अर्चना पाटील असून त्या पिछाडीवर दिसत आहेत.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरनंतर आता अनेकांचं लक्ष हे धाराशिव मतदारसंघाकडे लागलं आहे. हा मतदारसंघ खेचून आणण्यासाठी महायुतीने अनेक प्रयत्न केले. सभा, प्रचार रॅल्या काढल्या होत्या. मात्र आता त्याचा काहीही परिणाम झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. ओमराजे यांनी खासदार होणार आणि दिल्लीत जाणार असल्याचा विश्वास मनाशी पक्क ठेवला होता.
ओमराजे निंबाळकर यांनी 1 लाखांचा टप्पा ओलांडला
धाराशिव ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी 1 लाख मतांचा टप्पा ओलांडला असल्याची माहिती समोर आली. चौथ्या फेरीच्या सुरुवातीला ओमराजे यांना 1 लाख 3 हजार मते मिळाली. दोन्ही उमेदवारांमध्ये 44 हजार मतांचा फरक पडला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता अर्चना पाटील यांना मोठा धक्का बसला असून वन वे लढई पाहायला मिळाली आहे.
मतांचा टक्का ओमराजेंच्या पथ्यावर
2019 ला ओमराजे 1 लाख 27 हजार मतांनी निवडून आले होते. यंदाच्या वर्षी ओमराजे आपलाच रेकॉर्डब्रेक करतील का?, असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे. धाराशिव येथे 63.88 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. याकडे अनेकांचं लक्ष लागलं. यामुळे मतांचा टक्का हा ओमराजे निंबाळकर यांच्या पथ्यावर पडला असल्याची माहिती समोर आली आहे.
Social Plugin