राष्ट्रीय आरक्षण सूचीमध्ये समाविष्ट होण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली काल शनिवार 27 जुलै रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे सुनावणी घेण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे सदस्य भुवन भूषण कमल, सचिव आशिष उपाध्याय, सल्लागार राजेशकुमार, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद-सिंगल, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्यासह विविध जाती समुहाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्यातील लोध, लोधा, लोधी, बडगुजर, वीरशैव लिंगायत, सलमानी, किराड, भोयर पवार, सूर्यवंशी गुजर, बेलदार, झाडे, झाडे कुणबी, डांगरी, निषाद मल्ला, कुलवंतवाणी, कराडी, शेगर, नेवेवाणी, कानोडी, कानडी या जाती समूहाचा राष्ट्रीय मागासवर्ग यादीत समावेश करण्याबाबत आयोगाकडे निवेदन प्राप्त झाली आहेत. त्या अनुषंगाने या सुनावणीचे आयोजन आज करण्यात आले होते. या बैठकीत प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात आयोगाचे अध्यक्ष श्री.अहीर यांनी यावेळी संबंधितांना निर्देश दिले.
👉आयोगाचे अध्यक्ष अहिर यांच्याशी भेट घेऊन दिली सविस्तर माहिती
इंजिनीयर राजीव ठकरेले
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथी गृह येथे मागासवर्गीय राष्ट्रीय आयोगाची बैठक बोलावली होती .या बैठकीमध्ये लोधी, लोधा, लोध जातीच्या प्रतिनिधीनाही आमंत्रित करण्यात आले होते. ज्यामध्ये राणी अवंतीबाई संस्था काटोल चे राम खरपुरिया , आलोक संघटना चे ज्ञानेश्वर दमाहे , आनंदलाल दमाहे लोधी अधिकार जन आंदोलन समिती गोंदियाचे इंजिनीयर राजीव ठकरेले आदींनी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक , राजकीय, परिस्थिती वर विस्तृत चर्चा करून माहिती दिली. लोधी महासभाचे राधेश्याम नागपूर यांनी लोधी समाजा विषयी आयोगाचे अध्यक्ष अहिर यांना माहिती पटवून दिली. महाराष्ट्रातील विदर्भात लोधी ही जात मोठ्या प्रमाणात आहे . तर यावेळी विदर्भाचे चंद्रपूर लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे माझी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर हे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष असल्यामुळे आता आमच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. निवेदन देते वेळी राम खरपुरिया ,अनंतलाल दमाहे ,ज्ञानेश्वर दमाहे, इंजिनीयर राजीव ठकरेले , राधेश्याम नागपुरे ,दत्तू सिंग लोधी, एकनाथ खजुरिया, मोरेश्वर मुटकुरे, श्रीराम बासेवार ,नानेश्वर बिरणवारे, मयूर मुरोडिया इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
सारस न्यूज एक्सप्रेस
भरत घासले
9765416303
Social Plugin