सारस न्यूज एक्सप्रेस
गोंदिया. अनुसूचित जाती-जमाती आरक्षणातील क्रिमी लेयरबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात व विविध मागण्याना घेऊन देशभरातील विविध संघटनांनी २१ ऑगस्ट रोजी 'भारत बंद'ची हाक दिली आहे. गोंदियातील भारत बंदबाबत अनेक सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या बंदला पाठिंबा दर्शवला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात उभे असलेले एससी आणि एसटी समाजाचे लोक संसदेत विधेयक आणून हा निर्णय रद्द करण्याची मागणी करीत आहेत. समाजातील सर्व घटकांनी या बंदला सहकार्य करावे आणि शिस्तबद्ध व संवैधानिक पद्धतीने भारत बंदमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे शांततापूर्ण आवाहन करण्यात आले आहे.
उद्या 21 ऑगस्ट रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर, आंबेडकर चौक, नवीन प्रशासकीय इमारतीसमोर एससी-एसटी व इतर सर्व समाजवर्गातील लोक उपस्थित राहणार आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून बंदला सकाळी सुरुवात होणार आहे. भारत बंदच्या बॅनरखाली गोंदिया बंद समन्वय समितीचे सर्व सहकारी आपल्या मागण्यांचे विचार घेऊन रॅली काढून शहरातील व जिल्हातील आस्थापने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात उपस्थितांना संबोधित केले जाणार आहे.
भारत बंद दरम्यान काय खुले राहणार आहे?
उद्या बुधवारी भारत बंद, गोंदिया बंद दरम्यान रुग्णवाहिका, रुग्णालय, वैद्यकीय सुविधा या आपत्कालीन सेवा सुरळीत चालतील, असे गोंदिया बंद समन्वय समितीने सांगितले. याशिवाय सर्व सेवा बंद ठेवण्याची विनंती करणारे पत्र देण्यात आले आहे. भारत बंदला अनेक शाळा आणि महाविद्यालयांनी सुट्टी जाहीर केल्याची माहिती समोर आली आहे.
................................................
सारस न्यूज एक्सप्रेस
भरत घासले, 9765416303
Social Plugin