२)गोरेगाव - ठाणा टी पॉईंट ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा. *
३)दीड हजारच्या जवळपास रॅलीत नागरिक झाले सहभागी.
४)*शाळा, महाविद्यालये बंद .
५)*तहसीलदरांमार्फत राष्ट्रपतींना आरक्षण कृती समितीच्या वतीने निवेदन
सारस न्यूज एक्सप्रेस
अनुसूचित जाती, जमातीतील प्रवर्गामध्ये उपवर्ग निर्माण करण्याचा तसेच सर्व प्रवर्गाला क्रिमिलेअर लावण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तो अन्यायकारक ठरणार आहे. या निर्णया विरोधात एस सी, एस टी, ओबीसी, मायनॉरिटी आरक्षण बचाओ कृती समिती गोरेगावच्या वतीने आणि विविध समाजाच्या वतीने बुधवारी (ता. 21) सामूहिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंद ला गोरेगाव तालुका व्यापारी संघटन व नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने 100 टक्के कडकडीत बंद यशस्वी झाला. विविध साधनाने खेड्यापाड्यातून नागरिक मोर्चात सहभागी झाले होते.शाळा, महाविद्यालये देखील बंद ठेवण्यात आले होते.यानिमित्त 11 वाजता गोरेगाव ठाणा टी पॉईंट ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा नेवून सभा घेण्यात आली.सभेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुसंघाने मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर एस सी, एस टी, ओबीसी , मायनॉरिटी आरक्षण कृती समितीच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.सदर मोर्च्यात दिड हजारच्या जवळपास पुरुष -महिला सहभागी झाले होते.उल्लेखनीय म्हणजे, गोरेगाव प्रमाणेच कुराडी, पाथरी, मुंडीपार व इतर गावात बंद पाडण्यात आला.100 टक्के बंद यशस्वी करण्यासाठी एस सी, एस टी, ओबीसी, मायनॉरिटी आरक्षण बचाओ कृती समितीचे कार्यकर्ते, व्यापारी, दुकानदार व नागरिकांनी सहकार्य केले.
....................................................
सारस न्यूज एक्सप्रेस
भरत घासले, 9765416303
Social Plugin