आयटकच्या वतीने आदर्श आदिवासी सभागृहात जिल्हा मेळाव्याचे आयोजन.........., दुर्गा चौकातून काढण्यात आला मोर्चा....

.      सारस न्यूज एक्सप्रेस गोरेगाव 
  शहरातील आदर्श आदिवासी सभागृहात आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी शनिवारला दुपारी एक वाजता गोंदिया जिल्हा मेळाव्याचे आयटकच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी शहरातील दुर्गा चौकातून सर्व कामगार कर्मचाऱ्यांचा विशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे आदर्श आदिवासी सभागृहात सभेत रूपांतर झाले. कामगार ,अंगणवाडी, आशा गटप्रवर्तक, ग्रामपंचायत कर्मचारी शालेय पोषण आहार संबंधित कर्मचारी, विद्युत कर्मचारी, घरकामगार आदी उपस्थित होते. केंद्र व राज्य सरकारच्या कामगार कर्मचारी शेतकरी शेतमजूर व सामान्य जनता विरोधी धोरणाच्या विरोधात व असंघटित अंगणवाडी आशा गटप्रवर्तक आदी कामगारांना वेतनश्रेणी लागू करणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणी लागू करणे, वेतनावर शंभर टक्के अनुदान देणे, कामगार विरोधी 29 नवीन कायदे रद्द करणे व जुने कामगार कायदे लागू करणे, शेतमजुरांना वर्षात दोनशे दिवस कामाचा व सहाशे रुपये दैनिक मजुरीचा कायदा करणे, शेतकऱ्यांच्या मालाला एमएसपी कायदा करणे व स्वामीनाथन कमिशनच्या शिफारसी लागू करणे, स्मार्ट वीज मीटर लावणे बंद करणे, जातीनिहाय जनगणना करणे, महाराष्ट्र सरकारने केलेल्या नागरी सुरक्षा कायदा रद्द करणे, आदी मागण्यांना घेऊन हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाध्यक्ष कॉम्रेड हौसलाल रांहागडाले  जिल्हा सचिव कॉम्रेड रामचंद्र पाटील ,कॉम्रेड विजय चौधरी, कॉम्रेड मिलिंद गनविर, कॉम्रेड शालू कुथे, कॉम्रेड स्वप्नाली ठवकर, कॉम्रेड करूणा गनविर कॉम्रेड पौर्णिमा चुटे यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी उपस्थित होते.
..................................................
        सारस न्यूज एक्सप्रेस 
           9765416303