राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल पटेल यांचा बालेकिल्लां समजल्या जाणाऱ्या भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील तीन विधानसभा जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने दावा ठोकून या तिन्ही जागा आपल्या पक्षात आणण्यासाठी आपण आग्रहाने प्रयत्न करणार आहोत अशी माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गोंदिया येथील आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता मेळावा दरम्यान दिली.
काही दिवसानंतर महाराष्ट्र मध्ये विधानसभा निवडणुका घेण्यात येणार आहेत . यासाठी प्रत्येक पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गटाचे खासदार प्रफुल पटेल यांच्या बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील तीन विधानसभा जागेवर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून दावा ठोकण्यात आले आहे. शरद पवार गटाचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित गोंदिया येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यादरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा, अर्जुनी मोरगाव, व भंडारा जिल्ह्यातील तुमसर या विधानसभा जागेवर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आपले उमेदवार लढविणार आहेत . यासाठी उद्या मंगळवारी होणाऱ्या पक्षाच्या बैठकीमध्ये या तिन्ही जागेसाठी आपण आग्रहाची विनंती वरिष्ठ नेत्यांकडे आहे. कारण की या तीन ही जागा आमच्या हक्काच्या आहेत. यावेळी माजी खासदार खुशाल बोपचे ,माजी खासदार मधुकरराव कुकडे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, प्रदेश उपाध्यक्ष निरीक्षक बजरंग सिंह परिहार, प्रदेश महामंत्री दिलीप पणफुले , गोंदिया जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे व अनेक कार्यकर्ता उपस्थित होते.
....................................................
सारस न्यूज एक्सप्रेस
भरत घासले 9765416303
Social Plugin