अन् गोंदिया शहरात शिरले अस्वल

          सारस न्यूज एक्सप्रेस 
 गोंदिया शहरातील गणेश नगर संकुलात पहाटे ४ वाजता अस्वल दिसून आल्याने एकच खळबळ माजली. अस्वल वावरत असताना अग्निशमन दलाचे कर्मचारी बबली ठाकूर यांना दिसले, त्यांनी सहकाऱ्यांसह तत्काळ निरीक्षण करून वनविभागाला माहिती दिली.माहिती मिळताच वनविभागाचे बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळी गणेश नगर संकुलात असलेल्या जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागाच्या कार्यालयात अस्वलाने प्रवेश केला, तेथे प्रवेश करताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वार बंद केले.वनविभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  अस्वलाला  शांत करून पिंजऱ्यात कैद करण्यात आले. व त्यानंतर एका सुरक्षित स्थानी अस्वलाला सोडण्यात आले.
.................................................
सारस न्यूज एक्सप्रेस 
9765416303