. (सारस न्यूज एक्सप्रेस वृत्तसेवा) -बदलापूरसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडलेल्या महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध करण्यासाठी पुण्यात महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित मुक आंदोलनात जेष्ठ नेते शरद पवार, खा. सुप्रिया सुळे यांच्यासह नेत्यांनी भर भावसात सहभाग घेतला.
या आंदोलनानंतर सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत सांगितले की, महाराष्ट्रात कुणालाही जणू कायद्याची भीतीच वाटत नाही. माणूसपणाचा जागर करणारी माणसं अचानक एवढी हिंस्त्र आणि अमानवी का झाली असावी. महिलांचा आदर करणारं आणि त्यांच्यासाठी अतिशय सुरक्षित असणाऱ्या राज्यात महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. हे अतिशय चिंताजनक आणि गंभीर आहे. या अशा निर्ढावलेल्या गुन्हेगारांना कायद्याचा कसलाही धाकच उरला नाही. महाराष्ट्र सरकार कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी, सुरक्षित वातावरण देण्यासाठी सपशेल अपयशी ठरले आहे.
.....................................................
सारस न्यूज एक्सप्रेस
भरत घासले
9765416303
Social Plugin