मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून रक्षा बंधन उत्सवापूर्वीच लाडक्या बहिणीच्या खात्यात तीन हजार रुपये अनुदान जमा झाल्याने लाखो लाडक्या बहिणी आनंदीत झाल्या. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यानी तर लाडक्या बहिणींसोबत थेट संवाद साधत शुभेच्छा दिल्या. अशाच प्रकारचा एक आनंद सोहळा गोंदिया शहरातील राष्ट्रवादी अजित गटच्या जिल्हा उपाध्यक्ष कुंदाताई दोनोडे यांच्या घरी जाऊन लाडक्या बहिणीनी आनंद सोहळा साजरा केला .
मुख्यमंत्री लाडकी बहन योजना ही शासनाची एक महत्त्वाची योजना असून प्रत्येक लाभार्थी महिलेंच्या बँक खात्यावर प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये अनुदान जमा केल्या जाईल अशी ही योजना आहे. शासनाने रक्षाबंधन उत्सवाच्या पूर्वीच लाडक्या बहिणीच्या खात्यात दोन महिन्याचे अनुदान जमा केले आहे. पैसे जमा होण्याचा संदेश बहिणींच्या मोबाईलवर मिळताच लाभार्थी महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण दिसून आले. पैसे जमा होताच राष्ट्रवादी अजित गटा च्या जिल्हा उपाध्यक्ष कुंदाताई दोनोडे यांच्या घरी लाडक्या बहिणीने आनंद उत्सव साजरा केला. यावेळी कुंदाताई दोनोडे यांनी महिलांना संबोधित करतांना मार्गदर्शन केले की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व आमचे लाडके नेते खासदार प्रफुल भाई पटेल यांच्या अथक प्रयत्नामुळे ही योजना अमलात आली आहे. आमची सरकार ही विकसित सरकार असून यशस्वी सरकार आहे. ज्यांना योजनेचा लाभ मिळाला नसेल त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात येऊन संपर्क साधावे तर राष्ट्रवादी काँग्रेस मायनॉरिटी सेल चे अध्यक्ष रफिक खान यांनी सुद्धा उपस्थित लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देऊन योजनेचा लाभ कसा घेता येईल याची सविस्तर माहिती दिली. यावेळी सरोज शर्मा, इंदू ठाकूर, अनुसया पटेल, सोना श्रीवास्तव, तारा कुस, मंजुश्री दोनोडे, सुषमा गौतम, मानसी हत्तीमारे ,योगिता लिल्लारे ,दुर्गा हत्तीमारे, प्रिया पिपरहेते, ललिता मेश्राम, माया देवगडे, पुष्पा मेश्राम, रोशनी दुबे, साक्षी गुल्हाने, लीली जोसेफ, विद्या मस्करे ,रोशनी पेंदाम व आशा सेविका सरोज शंकरवार उपस्थित होत्या.
................................
सारस न्यूज एक्सप्रेस
भरत घासले
9765416303
Social Plugin